PMMVY YOJANA गर्भवती महिलांना मिळणार 5000रु

नमस्कार कन्हैया मल्टी अपडेट मध्ये आपले स्वागत आहे, आपण आज बघणार आहोत PMMVY YOJANA VISHYA आता प्रत्येक गरोदर महिलांना पहिल्या प्रसूतीसाठी मिळणार पाच हजार रुपये, काय आहे योजना कशी नोंदणी करायची आहे चला संपूर्ण माहिती बघूया ,त्यासाठी हा पूर्ण ब्लॉग वाचा.

 योजना :- प्रधानमंत्री मातृ वंदना PMMVY योजना हि केंद्र सरकारआणि राज्य सरकार यांच्या अंतर्गत गरोदर मातांना पाच हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. जी महिला व बाल विकास मंत्रालय व समाज कल्याण विभागामार्फत राबवली जाते प्रधानमंत्री मातृ वंदना योजना pmmvy  या योजनेमध्ये महिलांना ज्यावेळेस पहिल्यांदा प्रसूती असते किंवा महिला ज्यावेळेस गर्भवती असते पहिल्या गरोदरपणामध्ये त्यांना गव्हर्मेंट कडून सहा हजार रक्कम भेटते ही रक्कम रक्कम खेड्याकडील ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील जे गरीब व गरजू लोक आहेत ज्यांना मोल मजुरी करून काबाडकष्ट करून जीवन जगावे लागते तशा कुटुंबामध्ये लहान मुलांना आणि गरोदर मातांना अन्नद्रव्य पोषण आहार व्यवस्थित मिळत नाहीत आणि या रक्कमे मधून त्यांना त्या कालावधीमध्ये व्यवस्थितरित्या पोषण आहार मिळावा त्यासाठी ही रक्कम दिल्या जाते बऱ्याच ठिकाणी या रक्कमेचा खूप असा फायदा होतो बाळाच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि पोषणासाठी ही रक्कम दिली जाते ही रक्कम भेटण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका तसेच आशा वर्कर यांच्याशी संपर्क साधायचा या स्कीम मध्ये अर्ज करण्याआधी तुमचे आधार कार्ड व्यवस्थित नावाने बनलेले पाहिजे त्याचबरोबर तुमचे बँक अकाउंट असणे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे वेळोवेळी तुम्ही तुमच्या अंगणवाडी आणि आशा वर्कर सोबत संपर्क साधायचा आणि या योजनेचा अधिक प्रमाणात लाभ घ्यायचा खालील माहिती सविस्तर वाचून आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा .

                                                  ****पीएफ काढण्यासाठी अशी करा प्रोसेस ******

कसा मिळतो (PMMVY) योजनेचे लाभ :- या योजनेमध्ये लाभार्थी महिलेला एकूण पाच हजार तिच्या बँक अकाउंट ला जमा केले जातात.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत (PMMVY) दिले जाणारे रक्कम  टप्याटप्याने खालील प्रमाणे आहे.

पहिला हप्ता (PMVVY) : प्रत्येक गावामध्ये अंगणवाडी असतात त्या अंगणवाडी केंद्रात नोंदणी करण्यासाठी एक हजार रुपये दिले जाते.

दुसरा हप्ता :- गर्भधारणेच्या सहाव्या महिन्यानंतर दोन हजार रुपयांचा दुसरा हप्ता दिला जातो.

तिसरा हप्ता :- बाळाची जन्माची नोंदणी आणि लसीकरण च्या वेळी दोन हजार चा हप्ता दिला जातो.

अर्ज (PMMVY) :- हे फॉम तुम्ही online पण भरू शकता, या फॉम ची Official website:-साठी येथे क्लिक करा .किंवा तुमच्या केंद्राच्या आशावर्कर यांना भेट देऊन नोंदणी करू शकतात.

पात्रता (PMMVY) :-

 • अर्जदार हा भारताचा रहिवाशी असावा.  
 • ह्या योजनेचा लाभ एका महिलेला एकाच वेळेस मिळू शकतो.
 • केंद्र सरकार किंवा राज्य सरकारामध्ये काम करणारी महिला या योजनेसाठी पात्र नसणार.
 • PMMVY या योजनेसाठी अंगणवाडी सेविका पन अर्ज करू शकता.
 • लाभार्थ्याचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेले असणे गरजेचे आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया (PMMVY) :- जर तुम्ही या योजनेच्या अटी पूर्ण करत असाल, तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.

 • सर्वप्रथम या योजनेचा अर्ज भरून घ्यावा.
 • हे फॉर्म तुम्हाला अंगणवाडी केंद्रातून किंवा तुमच्या जवळच्या आरोग्य केंद्रातून मिळवु शकता.
 • फॉर्म घेतल्यावर त्यावर व्यवस्थित अचूकता माहिती भरून घ्यावी.
 • फॉर्मवर संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमचे कागदपत्रे जोडावे लागतील आणि ती अंगणवाडी केंद्रत किंवा आरोग्य सुविधा केंद्रात जमा कराव लागतात.
 • अंगणवाडी केंद्रातून किंवा आरोग्य केंद्रातून तुम्हाला एक पोचपावती दिली जाईल जी तुम्हाला भविष्यासाठी तुमच्याकडे ठेवावी लागेल.

रक्कम मिळाली की नाही ते कसे तपासणार :-

प्रधानमंत्री मातृ वंदना (PMMVY) योजनेंतर्गत दिलेली आर्थिक रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे हस्तांतरित केली जाते. तुम्ही खाली स्टेपद्वारे तपास करू शकता.

 • सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmmvy-cas.nic.in ला भेट द्यावी लागेल .
 • तुमच्या समोर लॉगिन फॉर्म उघडेल.
 • तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
 • लॉग इन केल्यानंतर, पुढील पेज तुम्हाला लाभार्थीची स्थिती जाणून घेण्याचा पर्याय मिळेल.
 • तुम्हाला लाभार्थीचा आधार नंबर टाकावा लागेल आणि सर्च वर क्लिक करावे लागेल.
 • क्लिक केल्यानंतर पेमेंट स्टेटस तुमच्या समोर येईल आणि तुम्हाला मिळालेल्या हप्त्याची संपूर्ण माहिती मिळेल.
 • तुम्ही तुमचा पेमेंट रिपोर्ट तपासू आणि डाऊनलोड करू शकता.

 

 

Leave a Comment