PF पीएफ काय आहे आणि तो कसे काढायला हवे ?

नमस्कार कन्हैया मल्टी अपडेट मध्ये आपले स्वागत आहे आपण आज बघणार आहोत पीएफ म्हणजे काय तो काढायचा कसा आपल्याला तो कोण कोणत्या क्षणी उपयोगी येतो त्याला काढण्यासाठी खर्च किती येईल त्यामध्ये गव्हर्मेंट चे काय काय रुल्स असतात याबद्दल सर्व माहिती.

पीएफ म्हणजे काय?
पीएफ म्हणजे प्रॉव्हिडंट फंड मराठी मध्ये सांगायचे झाले की जे वर्कर्स काम करतात त्यांना कंपनीकडून एक प्रॉव्हिडंट फंड त्यांच्या पगारांमधून कट होत असतो आणि तो पैसा गव्हर्मेंट कडे एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया कडे जमा होत असतो ही रक्कम कामगार वर्गांना पेन्शन म्हणून म्हतारपणे किंवा लग्नासाठी तसेच इतर काही कामासाठी वेळोवेळी उपयोगी पडत असतो यामध्ये जर तुम्हाला पूर्ण पीएफ काढायचा असेल तर फॉर्म नंबर 19 आणि 10c भरावे लागते यामध्ये फॉर्म नंबर 31 जर काम चालू असताना ऍडव्हान्स काढायची असेल तर भरावे लागते फॉर्म नंबर १९ काढण्यासाठी सगळ्यात आधी कंपनी सोडून कमीत कमी 60 दिवस तुम्हाला पूर्ण झाले पाहिजे त्यावेळेस तुमचा 19 नंबरचा पीएफ पूर्ण निघत असतो आता तो काढायचा कसा त्याबद्दल आपण खाली सविस्तर माहिती बघणार आहोत पूर्ण माहिती वाचल्यानंतर जर तुम्हाला काही अडचण असली तर तुम्ही आम्हाला मेल वरती प्रश्न विचारू शकता.

पीएफ काढण्यासाठी लागणारे कागदपत्र
1) यूएन नंबर.
2) आधार कार्ड.
3) बँक पासबुक किंवा चेक बुक

वरील सर्व कागदपत्रे पीएफ काढण्यासाठी आवश्यक आहेत परंतु पीएफ काढण्यासाठी तुमचा नंबर ॲक्टिव्ह असणे खूप महत्त्वाचे आहे तसेच तुमच्या नंबरला बँक लिंक असणे आवश्यक आहे बँक पासबुक वरती पॅन कार्ड वरती आधार कार्ड वरती आणि युनिफाईड पोर्टल म्हणजे पीएफ पोर्टल मध्ये तुमचे नाव सारखे असणे महत्त्वाचे आहे…
जसे की एखाद्या व्यक्तीचे नाव XXX YYY ZZZ असे आहे आणि ते जर डॉक्युमेंट वरती आरे XXX YYY असे असेल तर ते पीएफ निघण्यास प्रॉब्लेम येतात त्यासाठी बँक पासबुक वरती आणि पीएफ पोर्टल मध्ये केवायसी करून सर्व डॉक्युमेंट वरती आणि पीएफ पोर्टल मध्ये नाव सारखे करणे आवश्यक आहे.

आपण यांचे पेज वाईज माहिती पाहणार आहोत तुम्हाला अनुक्रमे खाली दिली जातील त्यानुसार तुम्हाला ज्या पेज बद्दल माहिती हवी त्या पेजवर क्लिक करावे त्यानंतर त्यापैकी सर्व माहिती त्यामध्ये दिलेली असेल.

1) यूएन नंबर कसा सापडावा.
2) यूएन नंबर ऍक्टिव्ह करणे.
3) यांचा पासवर्ड बदलणे.
4) यूएन मध्ये बँक केवायसी करणे किंवा पॅन कार्ड केवायसी करणे.
5) कॉन्टॅक्ट डिटेल बदलणे.
6) नॉमिनेशन करणे.
7) कंपनी सोडल्याची तारीख टाकने.
8) नावामध्ये किंवा जन्म तारखे मध्ये बदल करणे.
9) दोन किंवा दोन पेक्षा जास्त कंपन्याचा पीएफ एकत्र करणे

10) ऑनलाइन फॉर्म 31,19,10c & 10d.
11) पीएफ पासबुक व स्टेटस चेक करणे.

1) यूएन नंबर कसा सापडावा.
I) यूएन नंबर नसल्यास युनिफाईड पोर्टल उघडावे त्यामध्ये Know Your Uan या ऑप्शनवर जावे.
Ii) या ऑप्शनवर गेल्यानंतर मोबाईल नंबर टाकावा जो मोबाईल नंबर तुम्ही कंपनीमध्ये काम जॉईन करताना दिलेला असेल दुसरा मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमची माहिती येणार नाही.
त्यानंतर त्याखाली दिलेल्या कॅपच्या त्या बॉक्समध्ये टाकावा आणि रिक्वेस्ट ओटीपी या बटणावर क्लिक करावे.
Iii) त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या टेक्स्ट मेसेज मध्ये एक ओटीपी रिसीव होईल तो ओटीपी पोर्टल वरती टाकावा.
Vi) ओटीपी टाकल्यानंतर पुन्हा कॅपचा टाकून valid otp करावे.
त्यानंतर तुमचे नाव आधार प्रमाणे टाकावे डेट ऑफ बर्थ आधार नंबर आणि कॅपच्या इतक्या गोष्टी टाकून शोमा या टॅब वर क्लिक करावे तुमचा नंबर तुम्हाला शो होईल.

2) यूएन नंबर ऍक्टिव्ह करणे.
यु एन नंबर ऍक्टिव्ह करण्यासाठी तुम्ही पोर्टल वर गेले की important links मध्ये Active Uan या टॅब वर क्लिक करावे त्यानंतर नंबर किंवा मेंबर आयडी टाकून आधार नंबर आधार वरील नाव डेट ऑफ बर्थ मोबाईल नंबर आधार ला लिंक असलेला नंतर कॅपच्या हे टाकल्यानंतर क्लिक करून गेट अथोनिकेशन पिन या टावर क्लिक करावे त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी रिसीव होईल तो ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला नंबर आणि पासवर्ड टेक्स्ट मेसेज मध्ये रिसीव होईल तो मेसेज नंबर आणि पासवर्ड तुम्ही युनिफोर्ड पोर्टल मध्ये टाकून साइन इन करू शकता.

3) यांचा पासवर्ड बदलणे.
पासवर्ड चेंज करण्यासाठी युनिफाईड पोर्टल वरती फॉरगेट पासवर्ड या नावाचा ऑप्शन आहे या ऑप्शन वरती जाऊन तुम्हाला तुमचा नंबर करायचा आहे त्यानंतर कॅप्चा टाकायचा नंतर सबमिट बटणावर क्लिक करायचा त्यानंतर तुम्हाला आधार प्रमाणे नाव आणि जन्मतारीख टाकून मेल फिमेल सिलेक्ट करायचं त्यानंतर व्हेरिफाय बटणावर क्लिक करायचं व्हेरिफाय केल्यानंतर खाली कॅपच्या टाकायचा आहे त्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे हे सर्व डेटा जर तुमच्या युनिफाईड पोर्टल मधल्या डेटाचे जुळत असेल तर सेंड ओटीपी वरती क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी आधार ओटीपी रिसीव होईल तो ओटीपी तिथे टाकायचं त्याबरोबर कॅपच्या टाकायचा आहे आणि व्हेरिफाय करायचं त्यानंतर न्यू पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड टाकायचे पासवर्ड मध्ये काही कॅरेक्टर काय अल्फाबेट्स आणि काही स्पेशल कॅरेक्टर जसे की पास ॲट द रेट वन टू थ्री या पद्धतीने तुम्ही पासवर्ड टाकू शकता.

4) यूएन मध्ये बँक केवायसी करणे किंवा पॅन कार्ड केवायसी करणे.
पोर्टल लॉगिन झाल्यानंतर प्रोफाईल इन्फॉर्मेशन या टॅब वर क्लिक करायचं तुम्हाला त्यामध्ये आधार पॅन बँक अकाउंट नंबर मोबाईल नंबर ई-मेल सर्व माहिती दिसेल जर तेथे नॉट अवेलेबल असं दिसेल दिसत असेल तर बँक आणि पॅन कार्ड साठी मॅनेज या टॅब वर जाऊन केवायसी या टॅब वर क्लिक करावे त्यानंतर बँक या टॅब वर क्लिक करून बँक अकाउंट नंबर इंटर करावे कन्फर्म बँक अकाउंट नंबर इंटर करावे बँक आयएफएससी एंटर करावे नंतर पण या टॅब वरती क्लिक केल्यानंतर पॅन नंबर करावा क्लिक करावे सेव्ह या बटनावर क्लिक करावे त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी रिसीव होईल तो ओटीपी टाकावा आणि व्हेरिफाय बटणावर क्लिक करावे त्यानंतर चार ते पाच दिवसांमध्ये तुमचे बँक अकाउंट नंबर पोर्टलची लिंक होईल चार-पाच दिवसात जर नाही झाला तर तुम्ही तुमच्या सोबत संपर्क साधू शकता.

5) कॉन्टॅक्ट डिटेल बदलणे.
लॉगिन मध्ये जायचं त्यामुळे प्रोफाइल या टॅब वर क्लिक करायचं सिम्पली तुम्हाला तिथे तुमचं नाव दिसेल आणि नावाखाली मोबाईल नंबर आणि ईमेल दिसेल त्यासमोर एक पेन्सिल चे चिन्ह दिसेल त्यावर क्लिक करायचं त्यानंतर चेंज कॉन्टॅक्ट डिटेल
टॅब वर जाईल तिथे तुम्हाला चेंज मोबाईल नंबर यावर क्लिक करायचं किंवा मेल आयडी चेंज करायचा असेल तर रजिस्टर न्यू ईमेल आयडी याच्यावर क्लिक करायचं ते येते इंटर न्यू मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्याखाली इंटर न्यू मोबाईल नंबर टाकायचा आणि गेट ओटीपी करायचं ओटीपी रिसीव झालं की ओटीपी टाकायचे त्यानंतर तुमची कॉन्टॅक्ट डिटेल चेंज होईल.

6) नॉमिनेशन करणे.
नॉमिनेशन करण्यासाठी लॉगिन केल्यानंतर मॅनेजर टॅब वरती क्लिक करायचे त्यानंतर इनोमिनेशन या टॅब वरती क्लिक करायचं त्यानंतर एस वरती क्लिक करायचं खाली तुम्हाला डिटेल्स शो होईल डिटेल टाकायची डिटेल टाकल्यानंतर तुम्हाला बटणावर क्लिक करायचं त्याखाली कोणाला किती पर्सेंट शेअर्स द्यायचे ते शो होईल त्यामध्ये तुम्ही शंभर टक्के द्यायचा असेल तर शंभर टक्के टाकू शकता किंवा मग अर्धे अर्धे पण करू शकता त्यानंतर इनोमिनेशन वरती क्लिक करायचं आणि आधार वेरिफिकेशन करून घ्यायचं त्यानंतर तुम्हाला नॉमिनी सक्सेसफुली असा मेसेज येईल त्यानंतर तुमचा स्वामी होऊन जाईल त्यानंतर तुम्ही त्या बाजूला नॉमिनेशन डिटेल वरती जाऊन त्याचे प्रिंट आऊट काढू शकता नॉमिनेशन करणे खूप गरजेचे आहे जेणेकरून भविष्यामध्ये जर तुम्हाला काही झाले तर तुमची जी रक्कम आहे ती तुमच्या वारसदाराला मिळणे सोपी होते.

7) कंपनी सोडल्याची तारीख टाकने.
Uan पोर्टल लॉगिन झाल्यानंतर मॅनेज या टॅब वरती जावे त्यानंतर मार्क एक्झिट नावाचा ऑप्शन येईल त्यावरती क्लिक करावे नंतर कंपनीची डिटेल तुम्हाला शो होईल त्यामध्ये आपल्या कंपनीचा मेंबर आयडी आणि नाव सिलेक्ट करून ज्या महिन्यांमध्ये तुम्ही काम सोडलेला आहे त्या महिन्याची तारीख तिथे ऑटोमॅटिक येईल तुम्हाला महिन्याची शेवटची तारीख किंवा तुम्ही काम सोडल्याचे कोणत्या तारखेला काम सोडलेले आहे याची खात्री करून ती तारीख तिथे टाकने आवश्यक आहे. जर तुम्हाला पूर्ण पीएफ काढायचा असेल तर मार्क एक्झिट टाक ने खूप महत्त्वाचे आहे त्यामध्ये फॉर्म नंबर 19 हा जर भरायचा असेल तर कंपनी सोडल्याची तारीख टाकल्यानंतरच हा फॉर्म भरता येईल आणि 10c सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही एक्झिट टाकू शकता.

8) नावामध्ये किंवा जन्म तारखे मध्ये बदल करणे.
सर्वप्रथम आपल्याला पीएफ पोर्टल लॉगिन करून घ्यायचे त्यामध्ये मॅनेजमध्ये बेसिक डिटेल्स या नावाच्या ऑप्शन वर क्लिक करायचं त्यामध्ये तुम्हाला आधारवली नाव व जन्मतारीख जशास तसे टाकायचे आहे खाली मे सहमत हो याच्यावरती क्लिक करायचं अशा पद्धतीने तुमच्या जन्मतारीख आणि नाव चेंज होईल.

9) दोन किंवा दोन पेक्षा जास्त कंपन्याचा पीएफ एकत्र करणे.
तुम्हाला पोर्टल लॉगिन झाल्यानंतर मॅनेजर बटणावर क्लिक करायचं त्यानंतर मार्क एक्झिट या ऑप्शन वरती क्लिक करायचं त्यानंतर तुमच्यासमोर मेंबर आयडी शो होईल ती मेंबर आयडी सिलेक्ट करून ज्या कंपनीची मेंबर आयडी आहे ती सिलेक्ट करायचे त्यानंतर तिथे डेट येतील डेट ही ऑटोमॅटिक येईल ऑटोमॅटिक आलेल्या महिन्यांमध्ये तुम्हाला डेट सिलेक्ट करायचे तुम्ही सोडलेली डेट सिलेक्ट केल्यानंतर रिक्वेस्ट ओटीपी वरती क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी रिसीव होईल आधारचा ते ओटीपी तिथे टाकायचा आणि त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं अशा पद्धतीने विधीन सेकंद मध्ये तुमची एक्झिट डेट कंपनी सोडल्याची तारीख भेट होईल त्यानंतरच तुम्ही तुमचा पूर्ण पीएफ म्हणजे फॉर्म नंबर 19 भरू शकता.

10) ऑनलाइन फॉर्म 31,19,10c & 10d.
ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी आधी तुमचं सर्व डिटेल्स अपडेट असलेली आवश्यक आहे जसे की आधार कार्ड वरचे नाव पीएफ पोर्टल मधले नाव बँक पासबुक वरचे नाव हे सर्व सारखे असणे आवश्यक आहे त्यानंतर तुम्ही पीएफ काढू शकता फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला लॉगिन करायचं लॉगिन झाल्यानंतर ऑनलाईन सर्व्हिसेस वरती क्लिक करायचं ऑनलाइन सर्विसेस वरती क्लिक केल्यानंतर सर्वात पहिला ऑप्शन फॉर्म नंबर 31 फॉर्म नंबर 19 आणि फॉर्म नंबर असे दिसेल त्यावर क्लिक करायचं त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची डिटेल दिसेल त्यामध्ये तुम्ही तुमचा अकाउंट नंबर जो केवायसीला टाकलेला आहे तो टाकायचा नंतर व्हेरिफाय करायचं व्हेरिफाय झाल्यानंतर प्रोसिड या बटणावर क्लिक करायचं त्यानंतर इथे तुम्हाला स्टेप बाय स्टेप कंपनीचे नाव सिलेक्ट करायचं कंपनीचं नाव सिलेक्ट केल्यानंतर जर तुम्हाला फॉर्म 31 भरायचा असेल तर ३१ फॉर्म वरती क्लिक करायचं नाही तर फॉर्म नंबर 19 वरती क्लिक करायचं आणि पुढे ऍड्रेस टाकायचा त्यानंतर पासबुक अपलोड करायचे फेसबुक 100 केबीच्या वरती आणि 500 केबीच्या आत मध्ये असावा नंतर मी सहमत आहे याच्यावरती क्लिक करायचं आणि ओटीपी पाठवायचा ओटीपी टाकल्यानंतर सबमिट करायचं अशा पद्धतीने तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता त्यानंतर तुम्ही त्यामध्ये तुमचं स्टेटस चेक करू शकता.

11) पीएफ पासबुक व स्टेटस चेक करणे.
तुम्ही ईपीएफओ पोर्टल खाल्ल्यानंतर ई पासबुक नावाचा एक ऑप्शन येतं त्यावर ती क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला आयडी पासवर्ड टाकायचा आणि पासवर्ड टाकल्यानंतर कॅपचा टाकून साइन इन करायचं साइन इन केल्यानंतर तुम्हाला तुमचं पासबुक शो होईल त्यामध्ये तुम्हाला पूर्ण एक रक्कम दाखवेल त्यानंतर मेंबर आयडी वरती क्लिक करायचं त्यामध्ये तुम्हाला मेंबर वाईज किती पैसे आहे ते कळतील त्यानंतर वरती क्लेम पासबुक अशी वेगवेगळे ऑप्शन असतील त्यामध्ये पासबुक वरती जाऊन तुम्ही तुमचे पूर्ण पासबुक बघू शकता क्लेम वरती जाऊन तुम्ही तुमचा रिझल्ट झालेले क्लिप पेंडिंग क्लेम आणि प्रोसेस मधले क्लेम बघू शकतात सर्वात महत्त्वाचा म्हणजे जर तुम्हाला ऍडव्हान्स पीएफ काढायचा असेल फॉर्म नंबर 31 त्यासाठी तुम्हाला तुमची रक्कम माहित असणे आवश्यक आहे ती पण तुम्ही येथे बघू शकता आणि अशा पद्धतीने अनालिसिस करून तुम्ही तुमचे पीएफ बघू शकता व काढू शकता.

4 thoughts on “PF पीएफ काय आहे आणि तो कसे काढायला हवे ?”

  1. thank you for all details
    …मला तुमच्या ब्लॉग मधून माझ्या pf काढायला खूप मदत मिळाली आहे धन्यवाद ….

    Reply

Leave a Comment