गणेश उत्सव 2023 परवानगीसाठी अर्ज कसा करावा

गणेश उत्सव 2023 परवानगीसाठी अर्ज कसा करावा गणेश उत्सव हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. हा सण भगवान गणेशाच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून साजरा केला जातो. हा सण प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जातो, परंतु तो इतर अनेक राज्यांमध्ये देखील साजरा केला जातो

 

              *******गणेश उत्सव परवानगी साठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा******

 

आपल्या सर्वांना माहीतच आहे गणेश उत्सव आला की सगळीकडे आनंद निर्माण होतो बाप्पाच आगमन झाले की सगळे आनंदी असतात दरवर्षी श्रावण संपला की लगेच बाप्पाच्या आगमन होते त्यासाठी सगळीकडे जल्लोष असतो पण ह्या जल्लोषांमध्ये बऱ्याच काही वेगवेगळ्या घटना घडू नये आनंदामध्ये दुःखाचे वातावरण निर्माण होऊ नये त्यासाठी आपल्या सर्वांनाच काळजी घ्यायची आहे आणि चांगल्या पद्धतीने बाप्पाच्या आगमनाचे शेवटपर्यंत स्वागत करायचे आहे त्यासाठी तुम्हाला ज्या त्या जिल्ह्यातील तुमच्या जवळील पोलीस ठाण्याचे परवानगी घ्यायची आहे परवानगी घेण्यासाठी महाराष्ट्र पोलीस आणि ऑनलाईन पोर्टल पण चालू केलेले आहे त्या पोर्टल वरती जाऊन तुम्हाला पोलिसांची परवानगी घेऊन पोलीस बांधवांना सहकार्य करायचे आहे त्याचबरोबर समाजाला सुद्धा सहकार्य करायचे आहे गणेश उत्सव यंदाच्या उत्सवासाठी पदाधिकाऱ्यांनी अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करून परवाना घ्या अशी आव्हान पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे याची पण आपण नोंद घ्यायला पाहिजे यंदाच्या गणेश उत्सव 19 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे शांततेत व आनंदात सर्वांनी हा गणेश उत्सव साजरा करायचा असे पोलीस पोलिसांचे सांगणे आहे गणेश उत्सव ठिकाणी काळात समोरील बाजूला कॅमेरा लावणे किंवा वेगवेगळ्या पद्धतीने निरीक्षण करणे ज्या त्या मंडळाची जिम्मेदारी राहते आणि ते करायला पाहिजे मूर्तीची सुरक्षा करणे ही गणेश उत्सव मंडळाची जिम्मेदारी आहे त्यासाठी गणेश उत्सव मंडळाने त्यांच्या पद्धतीनं सोय ठेवून गणेश उत्सव साजरा करायला पाहिजे असे पोलिसांचे आव्हान आहे परवानगीसाठी ऑनलाईन अर्ज केल्यावर त्याची प्रिंट काढून पोलीस ठाण्याशी  संपर्क साधावा परवाना मंजूर झाल्यावर पोलीस ठाण्याच्या त्यावरती सही शिक्का घ्यावा त्याशिवाय परवाना ग्राह्य मानला जाणार नाही याची सर्व गणेश उत्सव मंडळांनी माहिती घेतली पाहिजे असे पोलिसांचे स्पष्ट म्हणणे आहे तसेच एका गावामध्ये शक्यतो एकच गणपती बसवावा यासाठी युवा पिढीने पुढे येऊन पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे आणि शांततेत आनंदात गणेश उत्सव गावामध्ये साजरा करायचा आहे शहरातील गणेश उत्सव मंडळांना पोलीस ठाण्यातून ऑफलाइन परवाना दिले जाणार आहे सर्वांनी नेहमी अटीचे पालन करून आनंदात उत्सव साजरा करायचा आहे मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी विविध सामाजिक उपक्रमावर मंडळांनी भर द्यायचा आहे अर्ज ऑनलाईन कसा करायचा आपण बघणार आहे .

पोलीस परवाना साठी लागणारे कागदपत्रे
1. मंडळ किंवा संस्था धर्मदाय आयुक्तांचे नोंदणी पत्र.
2. गेल्या वर्षीच्या पोलीस ठाण्याचे परवाना काढलेले प्रत.
3. जर सार्वजनिक जागेत मूर्ति मांडलेली असेल तर ग्रामपंचायतचे किंवा नगरपरिषद चे नाहरकत प्रमाणपत्र किंवा खाजगी जागेमध्ये मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र.
4. तात्पुरत्या स्वरूपात जर वीज कनेक्शन घेतले असेल त्याची पावती.

गणेश उत्सव परवान्यासाठी अर्ज ऑनलाईन कसा करायचा
1. महाराष्ट्र पोलीस सर्विस फोर सिटीजन वर क्लिक करायचे किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

                                 *******गणेश उत्सव परवानगी साठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा******

2. मुख्यपृष्ठावर फेस्टिवल परमिशन एप्लीकेशन वर क्लिक केल्यावर नवीन पेज उघडेल ज्यामध्ये गणेश फेस्टिवल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
3. होमपेज ओपन झाल्यानंतर गणेश फेस्टिवल परमिशन एप्लीकेशन यावर क्लिक करायचा आहे.
4. अध्यक्ष किंवा सदस्याचे नाव टाकून लॉगिन आयडी ओटीपी टाकून रजिस्ट्रेशन करावे.
5. अकाउंट तयार झाल्यानंतर लॉगिन करा व त्यावेळी भाषा मराठी किंवा इंग्रजी निवडा.
6. सिटीजन सर्विस निवडून गणेश उत्सव परवानगी निवडा त्यानंतर फॉर्म उघडेल.
7. त्या फॉर्मवर मंडळाचा अध्यक्ष व पाच ते दहा सदस्याचे पूर्ण नावे मोबाईल क्रमांकाचा भरावीत.
7. गणेश उत्सव स्थापना तारीख व वेळ आणि मिरवणूक असल्यास तारीख व वेळ टाकावे विसर्जन मिरवणूक असल्यास होय नमूद करून तारीख व वेळ त्यात टाकावी लागणार आहे हे खूप महत्त्वाचे आहे.

जर तुम्ही मंडप लावलेले असेल
1. मंडप मालकाची संपूर्ण माहिती भरावी.
2. मंडप कोणत्या ठिकाणी लावायचा आहे त्या जागेची गल्ली किंवा नगर याची माहिती द्यावी.
3. मंडपाची लांबी रुंदी व गणेश मूर्तीची उंची याचीही माहिती भरावी.
4. गणेश उत्सवात देखावा साकारणार असल्यास त्याची माहिती भरावी.

अशा पद्धतीने सर्व नियमात राहून महाराष्ट्र पोलिसांना सहकार्य करावे.

अश्याच नवीन नवीन माहिती साठी आमचे whatsapp ग्रुप जॉईन करा

Leave a Comment